Posts

Showing posts from April, 2020

परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीत सूट

Image
बीड सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता राज्य सरकारमधील सर्व कार्यालयांमध्ये सेवा देत असलेल्या दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना लॉक डाऊनच्या काळात कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने ही याबाबत मागणी केली होती. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असुन सर्व शासकीय कार्यलयातील दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना आता उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे. सामान्य व्यक्तीच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, अशा वेळी कोरोना सारख्या महाभयंकर आजाराची लागण होण्याची भीती अधिक असते. तसेच राज्यात लागू असलेल्या संचारबंदी मुळे वाहतुक व दळणवळणाच्या अडचणीही आहेत; याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात उपस्थित राहण्यातुन लॉक डाऊनच्या काळात सूट द्यावी अशी आग्रही मागणी केली होती. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या अपंग आयुक्तालया मार्फतही याबाबतही या संबंधी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर धनं...

जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ समीर नवल यांची परळी उपजिल्हा रुग्णालयाला भेट..

Image
परळी येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग विविध उपाययोजना बाबत देखील कोरोना संदर्भात उपचारा संबधी प्रयत्न केले जात आहेत. आज जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ समीर नवल यांनी परळी येथील उपजिल्हा रूग्णालयाला आज मंगळवार रोजी भेट दिली असुन Dedicated Covid Hospital ची प्रत्यक्ष पाहणी केली वैद्यकीय अधिक्षक डॉ रामेश्वर लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या डॉक्टर स्टाफ नर्स यांच्याशी संवाद साधुन मार्गदर्शन केले.उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्या नंतर येथील कोविड-19 संदर्भातील नियोजन व तयारी पाहुन समाधान व्यक्त केले WHO सारख्या जागतिक आरोग्य संघटना यावर काम कसे करतात याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ रामेश्वर लटपटे,डॉ वैभव दुबे,डॉ दताञय केंद्रे,डॉ अर्शद शेख,डॉ दिलीप गायकवाड,स्टाफ इन्चार्ज निता मगरे,मनिषा महाडकर,अलका जगदाळे,सविता चाटे,शिला कुलकर्णी ,सुजाता जाधवर अदी रुग्णालयातील स्टाफ उपस्थित होता.

कोरोना विषाणूंचा वाढता प्रसार पाहता कोरोनाला हरवायचे असेल तर सवयी बदला- डॉ.अर्शद शेख

Image
परळी येथे कोरोना विषाणूंचा वाढता प्रसार पाहता प्रत्येकाने वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर खबरदारी घेण्याची व आपल्या जुन्या सवयी बदलून नव्या सवयी लावून घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन परळीतील वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्शद शेख यांनी आज सोमवार रोजी केले आहे.शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे पत्रकारांना कोविड-१९ बाबत प्रशिक्षण देताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन हा कोरोना वरील कायमस्वरूपी उपाय नसला तरी ह्या कालावधीमध्ये आपल्याला भावी संकटाला तोंड देण्याच्या उद्देशाने तयारी करण्यासाठी वेळ मिळाला आहे. तसे पाहिले तर सध्या प्रत्येकाकडे कोरोना बाबत माहिती भरपूर झालेली आहे. आता यापुढे आणखी माहितीची गरज नसून मिळालेली माहिती खऱ्या अर्थाने अंमलात आणण्याची गरज आहे.  यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, कुणाच्याही हातामध्ये हात न देता आपण लांबूनच हात दाखवण्याची सवय लावली पाहिजे. त्याचबरोबर पाच फुटांचे अंतर राखण्याची सवय तर आपल्या घरापासूनच लावली पाहिजे.प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क लावणे गरजेचे असून चेहऱ्याला चुकूनही हात लागणार नाही अशी सवय देखील करून घेणे गरजेचे...

परळीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात न. प.प्रशासनाचा खेळ थांबेना-प्रा पवन मुंडे

Image
परळी येथील घरणीकर रोड ते अरुणोदय मार्केट कडे जाणारी नाली बऱ्याच दिवसांपासून कचऱ्याने पूर्ण पणे भरल्या मुळे नाली ब्लॉक होऊन नालीचे पाणी रस्त्यावर आले आहे,त्या मुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे तरी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ब्लॉक झालेली नाली नगरपालिका प्रशासनाने लवकर खुली करावी अशी मागणी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी आज सोमवार रोजी एका निवेदनाव्दारे केली आहे. अगोदरच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने नागरिक धास्तावलेले आहेत,लॉकडाऊन मुळे नागरिक घरात बसून आहेत मात्र घरणीकर रोड वरील नाली कचऱ्याने संपूर्णपणे भरल्या मुळे या ब्लॉक झालेल्या नालीचे पाणी आता रस्त्यावर आल्याने तेथे रोगराई होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,नगरपालिका प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा याकडे कोणी  लक्ष देत नसल्याने तेथील नागरिक हतबल झाले आहेत आणि स्वतःचा जीव मुठीत ठेऊन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,तरी न प प्रशासनाने सदरील गंभीर विषय लक्षात घेऊन तेथील नाली त्वरित मोकळी करावी अशी मागणी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

परळीत वेताळ मंदिर परिसरात असलेल्या कुलर फर्निचर गोडाऊनला मोठी आग..

Image
 परळीतील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या समोरील वेताळ मंदिर परिसरात असलेल्या कुलर फर्निचर गोडाऊनला आज 11.30 मोठी आग लागली असून यात लाखोचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे सर्वत्र धुराचे लोळ दिसत आहे घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे

परळीत गोरगरिबांसाठी शिवभोजनथाळीची सुरुवात..

Image
परळी येथे बसस्थानका समोरील राजेश विभुते यांच्या हॉटेलमध्ये आज शिवभोजन थाळीची सुरुवात  रविवार रोजी स11 वा परळीच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.संकटाच्या काळात ही योजना अन्नपूर्णा ठरत आहे.मुख्यमंत्री यांची सर्वात चांगली योजना म्हणजे शिवभोजन थाळी स्वतःचे घर नाही,रोजच्या जेवणाची भ्रांत आहे.ज्यांच्या घरात चूल पेटत नाही,अशा निराधार,बेघर अश्या परळीत गोरगरिबांसाठी संजीवनी योजना म्हणून सिद्ध होत आहे.

सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल बातमी काय आहे तर वाचा..

Image
सध्या सर्व व्हाट्सअप वर फिरत असलेला लाकडाऊननंतर सुविधा बाबतचा चार्ट आणि त्या अनुषंगाने असलेली एक बातमी सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत असून ती साफ चुकीची  अफवा असून याबाबत बीड जिल्ह्यात अशा प्रकारचे कुठलीच हालचाल नसून तसे आदेश कुठेही नाहीत त्यामुळे व्हाट्सअप फेसबुक सोशल मीडियातील या अफवेवर व फेक चार्ट वर कोणीही विश्वास ठेवून नियमाचे उल्लंघन करू नये दि20 रोजी नेहमीप्रमाणेच मार्केट मध्ये संचारबंदी राहिल आतापर्यंत माहितीनुसार कुठल्याही प्रकारचा बदल व संचारबंदी मध्ये वेळेत काही बदल झालेला नसून दिलेल्या तारखेलाच त्याच वेळेत मार्केट चालू राहणार असल्याची माहिती यंत्रणाकडून मिळाली आहे.

पुरोगामी विचारांचा जागर ब्लॉगवर आपले स्वागत आहे

पुरोगामी विचारांचा जागर  ब्लॉगवर आपले स्वागत आहे

दर्जेदार साहित्य वाचा