परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीत सूट



बीड सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता राज्य सरकारमधील सर्व कार्यालयांमध्ये सेवा देत असलेल्या दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना लॉक डाऊनच्या काळात कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने ही याबाबत मागणी केली होती.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असुन सर्व शासकीय कार्यलयातील दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना आता उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे.
सामान्य व्यक्तीच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, अशा वेळी कोरोना सारख्या महाभयंकर आजाराची लागण होण्याची भीती अधिक असते. तसेच राज्यात लागू असलेल्या संचारबंदी मुळे वाहतुक व दळणवळणाच्या अडचणीही आहेत; याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात उपस्थित राहण्यातुन लॉक डाऊनच्या काळात सूट द्यावी अशी आग्रही मागणी केली होती. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या अपंग आयुक्तालया मार्फतही याबाबतही या संबंधी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता.
अखेर धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करत आजपासून सर्व कार्यालयातील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्याना लॉक डाऊन संदर्भात पुढील आदेश येईपर्यंत उपस्थित राहण्यापासून सूट जाहीर केली आहे.या निर्णयासह यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ना. मुंडे यांचे व महाविकास आघाडी सरकारचे

Comments

दर्जेदार साहित्य वाचा

परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

कोरोनाच्या काळात घरीच राहू सुरक्षित राहु..अन शिक्षण घेऊ

परळीत गोरगरिबांसाठी शिवभोजनथाळीची सुरुवात..

परळीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात न. प.प्रशासनाचा खेळ थांबेना-प्रा पवन मुंडे

पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे कांद्याचे पीक धोक्यात

बँकेचे मुख्य अधिकारी यांचे प्रेत झाडाला लटकलेले अवस्थेत सापडले आत्महत्या खून शोध सुरू

जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ समीर नवल यांची परळी उपजिल्हा रुग्णालयाला भेट..

आम्ही आमच्या स्वप्नां सकट चिरडले गेलो म्हणून चांगलं झालं कारण आमची स्वप्नांही आमच्यासारखीच दळभद्री स्वप्ने

पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या अडचणी असतील तर त्या मला थेट कळवाव्यात