Posts

परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

आता वीज चोरीला आळा बसणार गावात लढवली अनोखी शक्कल

Image
 केज येथे ग्रामीण भागात मीटर न घेता चोरीचा आकडा तारा टाकून चोरी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. कदम वाडी मध्ये 2017 पासून या गावात अधिकृत फक्त 20 मिटर वीज ग्राहक आहेत.  म्हणून येथील युवकांच्या व ग्रामस्थांच्या सहभागाने वीज चोरीला आळा घालण्यासाठी तारांवर.आज सकाळी प्लास्टिक पाईपचे आवरण बसून वीज चोरी रोखली आहे. तसेच गाव आकडे मुक्त करण्याचे काम लाईनमन विशाल गायकवाड यांनी आज (शनिवार) रोजी केले आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या अडचणी असतील तर त्या मला थेट कळवाव्यात

Image
 बीड  जिल्हा पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी यांनी शुक्रवारी जिल्हाभरातील सर्व पोलिस ठाण्यांना भेटी देवून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत पोलिस कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यावर आपण भर देणार असून, कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या मला थेट कळवाव्यात असेही सांगितले. येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील गुन्हे कमी करून घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला जास्तीत जास्त गती देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल रहावे असे आवाहन केले.

शिरूर कासार येथे रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट

Image
शिरूर शहरातील मुख्य रस्त्यावर अस्वच्छता वाढत आहे म्हणून शिरूर येथे रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या त्रासाला कंटाळून शहरातील संतप्त नागरिकांनी नगरपालिकेला  निवेदन दिले होते. शिरूर कासार नगरपालिका व पोलिसांच्या संयुक्त कारवाईस आज सकाळी सुरुवात केली आहे.  नगरपंचायत व पोलिसांनी मिळून संयुक्तपणे आज शुक्रवार रोजी जाहीर नोटीस काढली आहे. जनावरांना खुंठी ला दावे लावा अन्यथा दंडात्मक  कारवाईस सामोरे जावे लागले असे जाहीरपणे आदेश काढले आहे.

बँकेचे मुख्य अधिकारी यांचे प्रेत झाडाला लटकलेले अवस्थेत सापडले आत्महत्या खून शोध सुरू

Image
परळी येथील महेश अर्बन को-ऑपरेटिव ऑफ बँकेचे मुख्य अधिकारी देवेंद्र सोनारे गेल्या पाच वर्षापासून परळी येथे कार्यरत होते.आज (शुक्रवार) रोजी सकाळी  परळी आंबेजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी घाटातील एका झाडाला त्यांचे प्रेत लटकलेल्या अवस्थेत आढळून आहे.  ते  (दि24)  पासून बेपत्ता होते. बँकेचे मुख्य अधिकारी यांचे प्रेत घाटातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे  या भागात खळबळ उडाली आहे. आत्महत्या की खून  याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत

पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे कांद्याचे पीक धोक्यात

 बीड जिल्ह्यात चिंचाळा येथील शेतकऱ्यांचा कांदा जळून गेला आहे. म्हणून शासनाने कांदा गेलेल्या शासनाने तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी बाबासाहेब वाघुले यांनी आज (शुक्रवार) रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. परतीच्या पावसाने व वातावरणातील बदलाने कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. सध्या कांद्याचे पिक करपा रोगाच्या संकटात सापडलेला आहे. सकाळी पडणारे दव यामुळे कांद्यावर इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

कोरोनाच्या काळात घरीच राहू सुरक्षित राहु..अन शिक्षण घेऊ

Image
आज पासून दूरदर्शन वर सर्व विद्यार्थ्यांनसाठी आनंदाची बातमी ,  या चॅनलवर 1ली  ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमवर कार्यक्रम होणार आहे. वेळ खालीलप्रमाणे: @१०:३० ते ११ इयत्ता पहिली ते पाचवी, @११ते १२ इ.६ वी ते ९ वी  व ११ वी. @१ ते २ इ.१० वी व १२ वी तरी सर्व विदयाथ्र्यांनी याचा लाभ घ्यावा. व पालकांनी या कामी आपल्या पाल्यांना मदत करावी हि विनंती .   -

दर्जेदार साहित्य वाचा

परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

कोरोनाच्या काळात घरीच राहू सुरक्षित राहु..अन शिक्षण घेऊ

परळीत गोरगरिबांसाठी शिवभोजनथाळीची सुरुवात..

परळीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात न. प.प्रशासनाचा खेळ थांबेना-प्रा पवन मुंडे

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीत सूट

पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे कांद्याचे पीक धोक्यात

बँकेचे मुख्य अधिकारी यांचे प्रेत झाडाला लटकलेले अवस्थेत सापडले आत्महत्या खून शोध सुरू

जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ समीर नवल यांची परळी उपजिल्हा रुग्णालयाला भेट..

आम्ही आमच्या स्वप्नां सकट चिरडले गेलो म्हणून चांगलं झालं कारण आमची स्वप्नांही आमच्यासारखीच दळभद्री स्वप्ने

पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या अडचणी असतील तर त्या मला थेट कळवाव्यात