परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

शिरूर कासार येथे रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट


शिरूर शहरातील मुख्य रस्त्यावर अस्वच्छता वाढत आहे म्हणून शिरूर येथे रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या त्रासाला कंटाळून शहरातील संतप्त नागरिकांनी नगरपालिकेला  निवेदन दिले होते. शिरूर कासार नगरपालिका व पोलिसांच्या संयुक्त कारवाईस आज सकाळी सुरुवात केली आहे.

 नगरपंचायत व पोलिसांनी मिळून संयुक्तपणे आज शुक्रवार रोजी जाहीर नोटीस काढली आहे. जनावरांना खुंठी ला दावे लावा अन्यथा दंडात्मक  कारवाईस सामोरे जावे लागले असे जाहीरपणे आदेश काढले आहे.

Comments

दर्जेदार साहित्य वाचा