परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

परळीत गोरगरिबांसाठी शिवभोजनथाळीची सुरुवात..


परळी येथे बसस्थानका समोरील राजेश विभुते यांच्या हॉटेलमध्ये आज शिवभोजन थाळीची सुरुवात  रविवार रोजी स11 वा परळीच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.संकटाच्या काळात ही योजना अन्नपूर्णा ठरत आहे.मुख्यमंत्री यांची सर्वात चांगली योजना म्हणजे शिवभोजन थाळी स्वतःचे घर नाही,रोजच्या जेवणाची भ्रांत आहे.ज्यांच्या घरात चूल पेटत नाही,अशा निराधार,बेघर अश्या परळीत गोरगरिबांसाठी संजीवनी योजना म्हणून सिद्ध होत आहे.

Comments

दर्जेदार साहित्य वाचा